Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेअर बाजारात हाहाकार ; निर्देशांक तब्‍बल ३१०० अंकांनी कोसळला

मुंबई (वृत्तसंस्था) करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत गंभीर परिणाम होत आहे. यामुळे आज देखील शेअर बाजारात ऐतिहासिक पडझड बघावयास मिळाली. निर्देशांक तब्‍बल ३१०० अंकांनी तर तर निफ्‍टी तब्बल ९५० अंकांनी कोसळला.

 

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईसह आशियाई शेअर बाजारात कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. जपान, अमेरिकेतील शेअर बाजारही कोसळलेले आहेत. परिणामी मुंबई शेअर मार्केटही 10 टक्क्यांनी कोसळला. त्यामुळे शेअर मार्केटचे व्यवहार बंद करण्यात आले. शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच त्यात ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण होऊन तो २९६८७.५२ अंकांवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ९६६.१ अकांची घसरण होऊन तो ८६२४.०४ अंकांवर पोहोचला. मार्च २०१८ नंतर गुरूवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय शेअर बाजार १० हजाराच्या खाली आला होता. दरम्यान, शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये धास्ती वाढली आहे.

Exit mobile version