शेंदूर्णी श्री त्रिविक्रम महाराज प्रभातफेरीची तप पुर्ती

शेंदुर्णी, प्रतिनिधी | येथील श्री.त्रिविक्रम महाराज प्रभात फेरी मंडळच्या प्रभात फेरीची १ तप पुर्ती म्हणजेच १२ वर्षे पूर्ण झाले आहेत. शेंदुर्णी येथे १८ नोव्हेंबर २००९ सकाळी ५ पासून प्रभात फेरी सुरू झाली असून ती आजतागायत नियमितपणे सुरू आहे.

 

परमपूज्य गोपालजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रभात ही फेरी सुरू झाली, त्यासाठी मानकभाऊ काबरा यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रभातफेरीचे वैशिष्ट्य म्हणजे पाऊस असो किंवा थंडी असो प्रभात फेरी नेहमीच्या वेळेवर निघते त्यात १२ वर्षात कधीही खंड पडला नाही. या प्रभात फेरीमध्ये शरद झंवर, दिलीप शिंपी, रघुनाथ गुजर, अशोक बारी, सुनील गरुड, सुकलाल बारी, बाबूलाल माळी, अशोक बडगुजर, बळीराम नोटके, दत्तू चौधरी, अशोक कुमावत, माधव लोखंडे, सुलोचनाबाई गुजर, निर्मलाबाई गुजर, यमुनाबाई गुजर, सुभद्राबाई वानखेडे, चंद्रकला बारी, सविता बारी, चंद्रकला गुजर, सखुबाई गुजर, प्रीती झंवर, साधना झंवर, प्रमिला पाटील, सुखताई पाटील, सुप्रभा पारळकर, सुशिलाबाई गुरव, आवडाबाई ठाकूर या प्रभातफेरी मंडळ सदस्यांचा समावेश आहे. रोज सकाळी ५ वाजता प्रदक्षिणा करून भगवान श्री.त्रिविक्रम दर्शन व हरिनाम गजर केला जातो.

Protected Content