Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदूर्णी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी | हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शेंदूर्णी येथे शिवसेना शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

आज हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 11 वाजता शेंदूर्णी शिवसेनेच्या वतीने पहूर दरवाजा , मारुती मंदिरा समोरील नियोजित पुतळ्याचे जागेवर परंपरे प्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रसिद्ध सिनेगायक, तथा मेणगावचे उपसरपंच पी गणेश यांच्या हस्ते माल्यार्पण करून बाळासाहेब यांच्या प्रतिमेस जेष्ठ शिवसैनिक ह. भ. प .जीभाऊ पाटील यांनी तर नियोजित छत्रपतींच्या पुतळा फलकास स्नेहदीप गरुड व शिवसेना तालुका उप प्रमुख डॉ. सुनील अग्रवाल यांनी पूजन करून माल्यार्पण केले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय सुर्यवंशी, यांनी प्रास्ताविक केले तसेच परिसरातील हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेबांना प्रेम करणारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा, संजय गरुड, राष्ट्रवादी डाँ. सेल चे जिल्हा अध्यक्ष डाँ.सागर गरुड, कडोबा बाबा पाटील,जेष्ठ शिवसैनिक संतोष माळी, अशोक बारी, विलास बारी, बारकू जाधव, सिदेश्वर पाटील, नितीन गुजर, राजू पाटील, अरुण गवळी, संदीप काटोले, तुकाराम पाटील, सुनील बारी,मेणगाव चे शिवसैनिक दीपक पाटील,गणेश कोळी, आनंदा कोळी, राहुल ढमाले, पत्रकार अँड. देवेंद्र पारळकर विलास अहिरे, हमीद शेख, सामाजिक कार्यकर्ते अजय अग्रवाल, श्रीकांत काबरा,भगवान बारी, राजू गुजर, बाळु कुलकर्णी, ह .भ .प .हिवाळे महाराज, दशरथ पाटील,
महिला आघाडी चंद्रकला पाटील, सिंधुताई माळी, वंदना बारी, ज्योस्ना अग्रवाल, ज्योती गुजर, पूजा भोई व अन्य महिला सर्व शिवसैनिकांनी व बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार जेष्ठ शिवसैनिक सुनील गुजर यांनी केले.

Exit mobile version