Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदूर्णी येथे रामजन्मभूमीवर राम मंदीर भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने प्रतिमा पूजन

शेंदूर्णी ,प्रतिनिधी । येथे विश्वहिंदू परिषदेच्यावतीने रामजन्मभूमी अयोध्यात होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमित्ताने पारस जैन पतसंस्था चौकात प्रभू रामचंद्र प्रतिमा पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला.

रामजन्मभूमीवर राम मंदीर भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने प्रभू रामचंद्र प्रतिमा पूजन करतांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, जेष्ठ नेते उत्तमराव थोरात,पारस जैन पतसंस्था संचालक शांतीलाल जैन, प्रफुल्ल पाटील, नामदेव बारी, सुनील शिनकर, अजय जहागीरदार, संजय गुरव, नगरसेविका ज्योती गायकवाड, नगरसेवक गणेश जोहरे, राहुल धनगर ,नितीन शेटे उपस्थित होते. यावेळी मनोज बैरागी यांनी व संजय गायकवाड यांनी सपत्नीक प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी आरती म्हणुन पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच प्रसादाचे वाटपही करण्यात आले. तसेच परकोट गल्लीत चौकात नगरसेवक निलेश थोरात, अशोक मराठे, भगवान मराठे मित्र मंडळींनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले. तसेच श्रीराम मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी गावातील प्रमुख पाच व्यक्तींच्या हस्ते पूजन करण्यात आले. ५०० वर्षांपासून प्रभू श्रीराम मंदिर प्रतीक्षा संपल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभूराम यांचे लवकरच भव्य दिव्य मंदिर अस्तित्वात येईल अशी कामना उपस्थितांनी केली.

Exit mobile version