Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदूर्णीत श्रीराम मंदिर भूमिपूजन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

शेंदूर्णी, प्रतिनिधी। अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रा स्व संघ सरसंघचालक मोहन भागवत व संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असलेल्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव शहराच्या प्रमुख चौका-चौकात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदे तर्फे करण्यात आले.

आरती व प्रतिमा पूजनाचा प्रमुख कार्यक्रम प्रभू श्रीराम मंदिरात आयोजन करण्यात आले होते. वाडी दरवाजा हनुमान मंदिर, संत रुपलाल महाराज चौक, होळी मैदान, गांधी चौक, वाचनालय चौक, पारस चौक, परकोट गल्ली, अहिल्याबाई होळकर चौक, छत्रपती शिवाजी नगर, आनंद नगर, संत गंगागिरी महाराज मंदिर याठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जल्लोषात विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ, बजरंग दल, दुर्गा वाहिनी व विविध हिंदुत्ववादी संघटना व पदाधिकारी प्रांत समरसता प्रमुख वामनराव फासे, रामभक्त कारसेवक उत्तमराव थोरात, गोविंदराव अग्रवाल, अजय जहागीरदार, सुनील गावंडे, प्रदीप गुजर, तुकाराम पाटील, शांतीलालजी जैन, सतीश बारी, निलेश थोरात, श्रीकृष्ण चौधरी, गणेश पाटील, संदीप ललवाणी, सुनील शिणकर, भागवत राऊत, मयूर माळी, किशोर वाघ,शरद बारी, ऍड देवेंद्र पारळकर, जयवन्त पिसे, राहुल धनगर, नितीन अग्रवाल, अरुण जोशी, किटकूल जोहरे, विजय धुमाळ, सुनील शेटे मोहिनी पाटील, कमल जहागीरदार,.शुभांगी फासे, रंजना धुमाळ, माधुरी मराठे, .दीपाली बारी, शैलजा पारळकर, नीता गायकवाड स्मिता शेटे, यासह इतर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात श्रीराम प्रतिमेचे आरती पूजनव प्रसाद वाटप कार्यक्रम मोठा जल्लोष करून उत्साहात साजरा केला. शेंदूर्णी शहरातील ब्राह्मण गल्ली येथील आज अयोध्येत श्रीराममंदीराचे भूमिपूजन सोहळा निमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याचें स्वप्न पुर्ण होत असल्याने शिवसेना शेंदूर्णी शहर शाखेच्यावतीने श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राची आरती व पुजन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख भैयाभाऊ गुजर अशोक दादा बारी.अजय भाई.सोनू नेरपगारे राजू पाटील संजय पाटील शिवसैनिक श्रीराम भक्त उपस्थित होते.

Exit mobile version