Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदूर्णीत भाजपाने वीज बिले फाडली

 

शेंदूर्णी : प्रतिनिधी । येथिल भाजपच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत आज वीज बिल माफीसाठी आंदोलन केले वीज बिले फाडून फेकली

सुरवातीला गोविंद अग्रवाल यांनी आंदोलना मागील भूमिका सांगतांना सरकारने कोरोना काळातील वीज बिल माफी विषयावर सहा महिन्यांपूर्वी जनतेला आश्वासन दिले होते परंतु आता सरकार शब्द फिरवत आहे विजे संदर्भात जनतेच्या अनेक समस्या असून त्या त्वरित सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली

यावेळी अमृत खलसे, टी.के.पाटील, प्रफुल्ल पाटील, सुनील शिनकर, किरण बारी, दिलीप बारी, कडोबा माळी, एकनाथ कोळी, पंकज गुजर, नगरसेवक शरद बारी, राहुल धनगर, शाम गुजर, शाकिर पिंजारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी वीजबिल होळी (जाळपोळ) करण्यासाठी मज्जाव केल्यामुळे पोलिसांचे हस्तक्षेपामुळे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात वीज बिल होळी ऐवजी वीज बिल फाडो आंदोलन करावे लागले,

Exit mobile version