शेंदुर्णी येथे २६५ नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कार्यदेशाचे वाटप

शेंदूर्णी प्रतिनिधी | येथील नगरपंचायतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेतील २६५ लाभार्थ्यांना माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते कार्यादेश वाटप व  कोरोना योद्धा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते  आशा सेविका, लॅब असिस्टंट, व इतर कोरोना योध्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिरात नागरिकांना कोशिल्ड लसीचे डोस देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदूर्णी नगरपंचायत नगराध्यक्षा विजया खलसे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम थोरात, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे उपस्थित होते. भाजप नेते उत्तम थोरात, अमृत खलसे व गोविंद अग्रवाल यांनी आपल्या भाषणात नगरपंचायतच्या प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आ. गिरीश महाजन यांच्याकडे केली. यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना शेंदूर्णी नगरपंचायतकडून मंजूर अनुदान प्राप्त प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अभिनंदन केले व केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेत मिळणाऱ्या अनुदानातून चांगल्या दर्जाचे घरांचे निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच शेंदूर्णी नगरपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकाराकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक निलेश थोरात, सतीश बारी,गणेश पाटील, शरद बारी, शाम गुजर, राहुल धनगर, अलीम तडवी, गणेश जोहरे, ऍड. धर्मराज सुर्यवंशी ,नगरसेविका रंजना धुमाळ,  साधना बारी, संगीता बारी, ज्योती गायकवाड, प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहित जोहरे, डॉ.वानखेडे ,डॉ.आदित्य पाटील, विद्युत मंडळ अभियंता चौधरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. लसीकरण शिबिरासाठी भाजपचे शहर अध्यक्ष पंकज गुजर, जोगेश्वर अग्रवाल,पिंटू काझी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले तर सूत्रसंचालन नगरसेवक निलेश थोरात यांनी केले शेवटी आभार अमृत खलसे यांनी मानले.

 

Protected Content