Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी येथे क्वॉरंटाईन केलेल्या ‘त्या’ ११ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । नाशिक येथील कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या येथील ११ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने परिसरातील जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

याबाबत वृत्त असे की, शेंदुर्णी येथे सासुरवाडी असणार्‍या नाशिक येथील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वीच निष्पन्न झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, त्याच्या संपर्कात आलेल्या शेंदुर्णी येथील ११ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचे स्वॅब सँपल घेऊन ते चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सायंकाळी हे रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले असून ते सर्व जण निगेटीव्ह असल्याची माहिती शेंदुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनातर्फे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, क्वॉरंटाईन केलेल्या ११ जणांचा रिपोर्ट नेमका काय येतो याकडे सर्व शेंदुर्णीकरांचे लक्ष लागले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने परिसरातील जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

Exit mobile version