Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी येथे कोरोना योध्द्यांचा सन्मान

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिना निमित्त माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार राज्यभर महिला कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्यानुसार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरोना योध्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेल तर्फे सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटक सचिव व बुलढाणा जिल्ह्याच्या निरीक्षक सौ.वंदना अशोक चौधरी यांनी तर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य सेविका राजश्री पाटील, मालती फडणीस, गट प्रवर्तक सविता कुमावत, परिचारिका श्रीमती शोभा घाटे, अल्का लोणे, मंजु जावळे यांना सन्मानपत्र कोरोना योध्या म्हणुन सन्मानित केले. या वेळी बोलतांना वंदना चौधरी यांनी सांगितले की सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते प्रपंच जबाबदारी पाळून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सेस, आशासेविका जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत.त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास नक्की आळा बसेल असा विश्‍वास असल्याचे मत व्यक्त करून कोरोना महिला योध्या विषयी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कुमावत यांनी तर आभार आरोग्य सेविका शोभा घाटे यांनी मानले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल निकम, डॉ.श्रद्धा पाटील,डॉ आदित्य पाटील,मलेरिया पर्यवेक्षक संजय सुरळकर, यशोदीप अशोक चौधरी, दीपक किटकूल जोहरे आदी मान्यवर उपस्थीत होते.

Exit mobile version