Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी येथील विद्यार्थ्यांचे बारावी परिक्षेत घवघवीत यश

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी)। शहरातील राजमल लखीचंद ललवाणी विद्यालय, श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा बारावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

राजमल लखीचंद ललवाणी विद्यालय
शेंदूर्णी येथील शेंदुर्णी राजमल लखीचंद ललवाणी विद्यालयाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात विज्ञान शाखा – प्रथम -अनुराग गजानन पाटील ९०.७६टक्के, द्वितीय -कृष्णा राजेश ढगे ८६.१५टक्के, तृतीय -आदित्य गोपालसिंग बेडवाल ८३.०८टक्के. वाणिज्य शाखा- प्रथम -आरती सोपान गरूड ८०.७६टक्के, द्वितीय -किर्ति पांडुरंग जाधव ७६.७७ टक्के, तृतीय -सानिका दत्तात्रय पाटील ७२.१५ टक्के. कला शाखा- प्रथम कल्याणी भागवत चौधरी ७३.०८ टक्के, द्वितीय अक्षय संतोष गायकवाड ७०.१६ टक्के, तृतीय अनिता ज्ञानेश्वर पाटील ६९.५४ टक्के असे गुण मिळविले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ईश्वरबाबुजी जैन, सचिव माजी आमदार मनिष जैन, संस्था समन्वयक प्रा.अतुल साबद्रा विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद खलचे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख विनोद वाघ, कार्यालयीन अधिक्षक सुनिल कुलकर्णी, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
डॉ.हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला बारावी परिक्षेत घवघवीत यश प्राप्त झाले. विद्यालयाचा एकुण निकाल ९८.६६ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम – सिध्देश संजय पाटील (८५.३८ टक्के), द्वितीय -अनुपम समाधान धर्मे (८४.९२ टक्के), तृतीय – वेदिका राजेंद्र पाटील व कार्तिक माणिक बेलुरकर (८०.८९टक्के), चतुर्थ -कुणाल अनिल ठाकुर (७८.९२टक्के), पाचवा-अभिषेक राजेंद्र ठाकरे (७७.५३ टक्के) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ.कौमूदी साने, उपाध्यक्ष, सचिव, संचालक डॉ. कल्पक साने यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्राचार्या शिलाबाई पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका राजेंद्र पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय
आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळाले आहे. महाविद्यालयाचा निकाल ९९.३४ टक्के लागला. विज्ञान शाखा – प्रथम गुजर दिव्या संदीप ८४.३० टक्के, वानखेडे रितेश उत्तम ८१.३८ टक्के, गरुड साईराज प्रवीण ७८.७६टक्के, धनगर अंजली अरुण ७८.६१टक्के, बैरागी वैष्णवी जगदीश ७८.६१ टक्के, गवळी आदित्य गोकुळ ७६.४६ टक्के असे गुण प्राप्त केले आहे. तर याच महाविद्यालयातील किमान कौशल्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम नाईक नितीन चारणदास ६५.०७टक्के, द्वितीय राठोड निलेश राजू ६४.१५ टक्के, तृतीय डामरे मोनाली श्रीराम ६३.२३टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

अप्पासाहेब र.भा.गरुड वाणिज्य विद्यालयाचा निकाल ९२.९८ टक्के लागला आहे. चव्हाण शेजल कमलेश ८१.०७टक्के, पाटील दिग्विजय रवींद्र ७९.८४टक्के, हटकर अंजली भास्कर ७५.५९टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत तर कला विभागाचा ५७.९६ टक्के निकाल लागला आहे. कला विभागात जाधव स्वप्निल युवराज ७४.६१ टक्के, वारुळे स्नेहा गणेश ७१.२३टक्के, उशीर दीपाली पंढरी ६८.१५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सागरमल जैन, सहसचिव दीपक गरुड संचालक उत्तमराव पाटील, प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील, प्राचार्य एस.पी.उदार याच्यासह सर्व प्राध्यापक,कार्यालय कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version