Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी फ्रुट सेलच्या सभासदांचे डॉ.केतकीताई पाटील यांनी केले अभिनंदन

शेंदुर्णी- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिकाडॉ.केतकीताई पाटील यांनी आज शेंदुर्णी येथील फ्रुट सेल सहकारी कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष संजयदादा गरुड व सभासदांची भेट घेऊन नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी फ्रुटसेलतर्फे डॉ.केतकीताई पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शेंदुर्णी ता.जामनेर येथील फ्रुट सेल सहकारी कर्मचारी संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच संजयदादा गरुड यांची सर्वमताने निवड झाली. या सहकारी कर्मचारी संस्थेत १३ सभासद निवडून आले आहेत. त्यानिमित्‍त सभासदांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी विशेष उपस्थीत राहून संजयदादा गरुड यांच्यासह सर्व सभासदांचे अभिनंदन केले. याप्रसंगी संध्या नारायण पाटील, ठाणसिंग नाना, डॉ.किरण सूर्यवंशी, प्रदीप लठ्ठा, राजू पाटील, रघुनाथ निळकंठ, जनार्दन रामचंद्र पवार, दशरथ रामू पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, प्रा.ईश्वर जाधव यांच्यासह सभासद उपस्थित होते.

Exit mobile version