Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी दक्षिण भाग विकासोच्या चेअरमनपदी गरूड तर व्हा.चेअरमनपदी गुजर बिनविरोध

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथिल दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यकारी मंडळाच्या चेअरमनपदी सुनिल गरूड तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण गुजर यांची पिठासन अधिकारी डी.व्ही.पाटील यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.

दोन पदासाठी दोन अर्ज आल्याने बिनविरोध
येथिल दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची सभा आज जामनेर तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयातील उपनिबंधक डी.व्ही.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य गजाननराव पटपेढीच्या सभागृहात सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून घेण्यात आली. यावेळी झालेल्या सभेत दक्षिण भाग विकास सोसायटीच्या चेअरमनपदासाठी सुनील भास्करराव गरुड तर व्हाईसचेअरमन पदासाठी प्रवीण गुजर यांचे एकमेव अर्ज सादर करण्यात आल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी डी. व्ही.पाटील यांनी घोषित केले.

नवनिर्वाचितांचा सत्कार
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सुनील गरुड यांचा संजय गरुड व नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन प्रवीण गुजर यांचा फारूक खाटीक यांनी सत्कार केला. मावळते चेअरमन विजय काबरा यांचा सुधाकर बारी, तर व्हाईस चेअरमन लुकमान शे. ताज मोहम्मद यांचा सागरमल जैन यांनी सत्कार केला. जेष्ठ संचालक मोहन बारी, तज्ञ संचालक प्रकाश देशमुख यांचा संजय गरुड यांनी तर तज्ञ संचालक रमेश राजपूत यांचा पत्रकार विलास अहिरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

पुढील वाटचालीसाठी दिल्यात शुभेच्छा
यावेळी प्रकाश देशमुख, संजय गरुड यांनी आपल्या भाषणातून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या प्रगती विषयी सजग राहण्याचा सल्ला दिला. नवनिर्वाचित चेअरमन सुनील गरुड यांनी संस्थेच्या व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाला सोबत घेऊन अहोरात्र झटणार असल्याचे सांगितले. या सभेत संस्थेचे सर्व संचालक व संचालिका तसेच संस्थेचे सचिव संजय बारकू चौधरी, लिपिक संजय चौधरी, सेल्समन एकनाथ गुजर उपस्थित होते.

Exit mobile version