Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णीत लॉकडाऊनची ऐसीतैशी; प्रत्येक बुधवारी भरतोय आठवडे बाजार

शेंदुर्णी प्रतिनिधी । जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. असे असतांना शेंदुर्णी शहरात मात्र लॉकडाऊनचे नियम ढाब्यावर ठेवून थेट नियमांचे उल्लंघन करत प्रत्येक बुधवारी आठवडे बाजार भरत आहे. विशेष म्हणजे नगरपंचायतकडून दंडात्मक कारवाई करण्याऐवजी कराची वसुली भाजीविक्रेत्यांकडून केली जात आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांचे जीवितांचे रक्षणासाठी राज्यशासन कठोर उपाययोजना आखून कुठल्याही स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ३ मे २०२० पर्यंत सक्तीचे लॉक डाउन घोषित करण्यात आले आहे. नागरिकांना घरातच राहण्याची सक्ती करतांनाच गर्दी जमवण्यापासून रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली. तसेच राज्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात सीआरपीसीचे कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केले आहेत तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. सोबतच साथरोग नियंत्रण कायद्याच्या भादंवी १८८ नुसार पोलीस प्रशासन गुन्हे नोंदवत आहे.

मात्र, शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या दुर्लक्षामुळे दर बुधवारी आठवडे बाजार भरत असून सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम धाब्यावर बसवून भरणाऱ्या या बाजारात नगरपंचायतकडून कर वसुली पण केली जात असल्याचे बाजारातील विक्रेत्याकडून कळाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपंचायत गटनेत्या नगरसेविका वृषाली गुजर व मोहसीना खाटीक यांनी ऑन कॅमेरा सांगितले की मुख्याधिकारी यांना वेळेवेळी कल्पना देऊनही जागतिक आरोग्य संघटना केंद्र व राज्य सरकारच्या कोरोना विषाणू प्रतिबंध उपाय योजनेचे सर्व दिशा निर्देशाचे उल्लंघन करून सदर बाजार भरत असतांना मुख्याधिकारी मात्र या गोष्ठीकडे साफ दुर्लक्ष करत आहे. बाजार भरण्यासाठी परवानगी दिली नाही, मग अनधिकृत बाजारातील भाजी विक्रेत्यांकडून कर वसुली कशी काय केली जात आहे. या प्रश्नावर नगरपंचायत नाहीतर अनधिकृत लोक वसुली करतील का असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करत कर वसुली करत असल्याचेही मान्य करत आहे.

मुख्याधिकारी यांचे कृत्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे असून कायद्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे, असे विरोधी नगरसेविकांनी सांगितले आहे तर मुख्याधिकारी हे अनधिकृत बाजार भरण्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे सांगून आपली जबाबदारी पोलीस प्रशासनावर ढोळत आहे. जिल्ह्यात छोट्या छोट्या ग्रामपंचायत पासून नगरपालिका व महानगरपालिका राज्य सरकारच्या कोरोना संबंधीच्या दिशा निर्देशाचे पालन करत असतांना शेंदूर्णी नगरपंचायत राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी षडयंत्र करत असल्याचे नागरसेविकांनी सांगितले आहे. पहुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी व सहाय्यक उपपोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी नगरपंचायत भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्या ऐवजी त्यांना जागा उपलब्ध करून देत आहे, बाजार कर वसूल करत आहे म्हणून कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बाजार करांच्या त्या दाखवून भाजी विक्रेते विरोध करतात तरी पोलीस कारवाई करतच असल्याचे सांगितले आहे.

————————————————-

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version