शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळ जळगावकडून गुणवंत विद्यार्थी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सोहळ्यात १५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

गुणवंत विद्यार्थी सोहळ्यात शुक्ल यजुर्वेदीय माध्यांदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांच्याकडून आलेल्या चेकचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच मंडळाकडून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवून सत्कार ही करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जळगाव शहरातील धनाजी नाना काॅलेजचे  प्रा. संदिप शामकांत जोशी हे होते. सर्व प्रथम संदिप जोशी व मंडळाचे अध्यक्ष अमोल जोशी यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण  करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष अमोल जोशी यांनी  प्रास्ताविक केले.  याप्रसंगी एकूण १५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात शैक्षणिक उपलब्धी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह कु. चित्रा राजेश नाईक या अंतर राष्ट्रीय साँफ्ट बाँल खेळाडूला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व  युवक संचालनालयाचा , महाराष्ट्र जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाला म्हणून विशेष सत्कार ही या प्रसंगी करण्यात आला. श्री. संदिप जोशी सरांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच क्षेत्र निवडून त्यात यशस्वी होण्यासाठी पंचसुत्री सांगीतली व त्याचा उपयोग केल्यास आपण  यशस्वी होवू शकाल असे सांगीतले  श्री. संदिप जोशी सरांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांशी गप्पांच्या माध्यमातून संवाद साधला. या प्रसंगी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. मिनाक्षी जोशी , उपाध्यक्ष  अजय डोहोळे,सचिव संदिप कुळकर्णी , कार्यकारणी सदस्य कमलाकर कुळकर्णी , प्रसन्न जोशी , सुरेश भट , राजेश शांताराम कुळकर्णी , राजेश नाईक , रेवती याज्ञिक, राजेश चंद्रकांत कुलकर्णी , उल्हास जोशी व मंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ याज्ञिक यांचे सह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. पल्लवी कुळकर्णी व संदिप कुळकर्णी यांनी केले तर आभार सौ. मिनाक्षी जोशी यांनी मांनले.

 

Protected Content