शिवेसेनेत गट, तट नाहीत – संजय सावंत

जळगाव : प्रतिनिधी । या जिल्ह्यात आणि अन्यत्रही शिवसेनेत कोणतेही गट , तट नाहीत .तसा प्रयत्न कुणी केलाच तर आम्ही सगळे मार्ग काढतो आणि काढूत . गुलाबराव पाटील आणि गुलाबराव वाघ माझ्यासोबत आहेत . आजची बैठक खास काहीच नव्हती नियमित चर्चेसारखी चर्चा झाली असे सांगत आज शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांनी आज जळगाव शिवसेनेतील अंतर्गत तणावावर पांघरून टाकले .

शिवसेना पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर संजय सावंत यांनी त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली . ते पुढे म्हणाले कि , कोणत्याही आंदोलनात पदाधिकाऱ्यांचा मान राखला गेला पाहिजे . येथील सेनेचे नगरसेवक प्युअर आणि प्युअर सोन्यासारखे आहेत . निष्ठावान आहेत . शिवसेनेचे तिकीट घेऊन ते निवडून आलेले आहेत कारण ते शिवसेनेचेच आहेत ज्यांना जायचे होते ते २ वर्षांपूर्वी सेनेतून गेले .सत्ता ज्यांची असते त्या सत्ताधार्यांचीच कामे होतात विरोधकांची होत नाहीत . तरीही मी हे सांगतो कि संघर्ष हा शिवसेनेचा पिंड आहे . लहान- मोठ्या गोष्टीवरून विचलित व्हायचे नाही संघर्ष आणि आपले काम करत राहायचे अशा स्वरूपाची आजची चर्चा झाली, असेही ते म्हणाले .

महापालिकेतील विरोधकांवर टीका करताना संजय सावंत म्हणाले कि , महापालिकेत सत्ता आणा १०० कोटी देतो , रस्ते तुळतुळीत करतो असे कोण म्हणाले होते हे ही सगळ्यांना माहिती आहे संघर्ष आणि आंदोलनातून शिवसेना पुढे आलेली आहे उद्धव साहेबांना राज्याच्या व्यथाणची जाणीव आहे आधीचे मुख्यमंत्री मराठवाडा किंवा विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून समजले जात होते . पण उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत .
एका प्रश्नाच्या उत्तरात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि , बिहारमधील राजकारणासाठी सुशांत नावाचे पिल्लू वापरले जातेय १ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांची झाली का सीबीआय चौकशी ? , राज्यपाल भेटले का त्या कुटुंबांना ?, राज्यपाल कंगनाला मात्र भेटले . खोदा पहाड और निकाला चुहा …. ३ महिन्यात काय झाले? , हेच झाले , असेच ते म्हणाले .

Protected Content