Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवारातील २५ क्विंटल हरभर्‍याला पेटवून दिले !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव बु॥ येथे शेतात आग लावुन सुमारे २५ क्विंटल हरभर्‍याचे पेटवुन नुकसान केल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी किनगाव बुद्रुक येथील राहणारे ईब्राहीम बिस्मिल्ला कुरेशी यांच्या डोणगाव शेत शिवारातील गट क्रमांक२३८मधील क्षेत्रातील शेतातील आज दिनांक १४ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतात मध्यभागी तोडणी करून ठेवलेला हरभरा सुमारे दिड लाख रूपये किमतीचा २५ क्विंटल हरभरा कुणीतरी अज्ञात व्याक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

आपल्या शेतातील हरभरा पेटल्याची माहीती शेजारच्या शेतातील लोकांनी शेतमालक ईब्राहीम कुरेशी यांनी कळविली. या संदर्भात ईब्राहीम बिस्मिला कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Exit mobile version