Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी नगर परिसरात चोरीच्या दुचाकी घेवून फिरणाऱ्या दोन्ही चोरट्यांना पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयडीबीआय बँकेसमोरून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलीसांनी मंगळवारी अटक केली होती. आज १६ डिसेंबर रोजी दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील चंद्रकांत गजानन बोदवडे रा. शिवाजी नगर यांची दुचाकी शहरातील नेहरू पुतळ्याजवळील आयडीबीआय बँकेजवळ दुचाकी (एमएच १९ सीजी ३५६५) लावली असता अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ पेट्रोलिंग करत असतांना दोन जण दुचाकीवर संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. दोघांना जवळ बोलावून माहिती घेतली असता जिवन सुकदेव ठाकरे (वय-२२) आणि पवन सुनिल कोळी (वय-२०) दोन्ही रा. कोळी वाडा डांभूर्णी असल्याचे नाव सांगितले. सोबत असलेल्या दुचाकीची माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांना शहर पोलीसांनी अटक केली होती. दोघांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दोघा संशयित आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.ना. भास्कर ठाकरे करीत आहे

Exit mobile version