Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी नगरात ६८ हजाराचा गुटखा पकडला; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारचालकाला अटक करण्यात आली आहे शहर पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून ६८ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गजानन बडगुजर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजी नगरात बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक आणि वितरण होत असल्याची समजले. ही माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना दिल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश दिले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शिवाजी नगरातील दुध फेडरेशनजवळ वाहनांची तपासणी केली असता (एमएच १९ सीव्ही ९८१८) क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात बेकायदेशील ६८ हजार २८० रूपये किंमतीचा बेकायदेशीर गुटखा आढळून आला. यात सिलबंद पॉकिटे, विमल पान मसाला, गुटखा, लहान आणि मोठ्या पुड्या आढळून आल्यात. कारचालक जगदीश महादेव सोनवणे (वय-३०) रा. भादोबा प्लॉट, कानळदा ता.जि. जळगाव याला अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील कार आणि सुगंधी पान मसाला असा एकुण ५ लाख ६८ हजार २८० रूपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आली. पो.ना. गजानन बडगुजर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा करीत आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या सुचनेनुसार सपोनि गणेश बुवा, पोहेकॉ निलेश बडगुजर, पो.ना. गजानन बडगुजर, पो.कॉ. दिलीप पाटील, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी कारवाई करत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे गेट क्रॉसकरून शिवाजी नगर दुध फेडरेशन जवळ ही कारवाई केली. आज संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Exit mobile version