Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी नगरात अनोळखी मृतदेह आढळला; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील रेल्वे गेटजवळ ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बेवारसस्थितीत आढळून आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्टेशनजवळील शिवाजी नगर भागातील रेल्वे गेटजवळ आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बेवारस रित्या एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दोन तास आढळून आलेला मृतदेह पडून होता. येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पोहेकॉ संजय झाल्टे आणि पोनाका रफिक पटेल यांनी धाव घेतली. मृतदेह खासगी रूग्णालयात जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी डॉ. बिराजदार यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ संजय झाल्टे आणि रफिक पटेल करीत आहे.

Exit mobile version