शिवाजी नगरातील तरुणाला ऑनलाईन ३८ हजार रुपयात गंडविले

जळगाव प्रतिनिधी । ऑनलाईन रिजार्चचे पैसे बँकेतून कापले गेले परंतु रिचार्ज झाला नसल्याने तरुणाने कस्टमर केअरला कॉल केला असता कस्टमर केअरने एटीएमची विचापुस करीत शिवाजी नगरातील तरुणाला ३८ हजार रुपयात गंडविले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी अफजल खान बिसमिल्ला खान (वय-३१) यांनी ११ सप्टेंबर रोजी गुगूल पे वरुन १४९ रुपयांचा ऑनलाईन रिजार्च केला. त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम कपात झाली परंतु त्यांचा मोबाईल रिचार्ज झाला नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवर जावून कस्टमर केअरचा नंबर मिळविला आणि त्याला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्या कस्टमर केअरने त्यांचे बोलणे ऐकूण घेतल्यानंतर तुम्ही कॉल कट करा मी तुम्हाला कॉल करतो असे सांगत त्याने अफजल खान यांना कॉल केला. यानंतर त्यांना ऐनी डेस्क हे ऍपलिकेशन डाऊनलोड करा असे सांगितल्यानंतर गुगल पे ओपन करण्यास सांगितले. त्यानंतर कस्टरमर केअरने एक कोड सांगून तो पाठविण्यास सांगितला परंतु तो कोड सेंड झाला नाही.

पैसे परत मिळतील असे सांगत विचारला एटीएमचा क्रमांक
कोड सेंड न झाल्याने कस्टमर केअरने अफजलला त्याच्या एटीएमवरील १६ अंकी क्रमांक आणि त्यांचे नाव विचारला असता. अफजल यांनी देखील त्यांना ही संपुर्ण माहिती सांगितली. यावर त्या तरुणाने तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटला जमा होती असे सांगत त्यांना तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा असे सांगितले. परंतु त्या इसमाने त्यांना ओटीपी न सांगता कॉल कट करुन टाकला.

कस्टरमर केअरसोबत बोलल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अफजल यांना त्यांंच्या खात्यातून १७ हजार ७३८ रुपये कपात झाल्याचा मॅसेज आला. त्यानंतर लागलीच दुसर्‍या मिनीटाला ८ हजार ५९० रुपये तर तिसर्‍या मिनीटाला १ हजार १५४ रुपये तर पाचव्य मिनीटात पुन्हा ९ हजार ९९९ रुपये कपात झाल्याचा मॅसेज आला. अफजलने तात्काळ आपले अकाऊंटमधील बॅलेन्स चेक केला असता त्यांच्या खात्यातून ३७ हजार ४८१ रुपये कपात झाल्याचे समजताच आपली फसवणुक झाल्याची त्यांना खात्री पटली. अफजल यांची ऑनलाईन फसवणुक झाल्यानंतर त्यांनी मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content