Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजीनगर येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

जळगाव,प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळ व अशोक सपकाळे आणि धर्मरथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज २१ जून रोजी क्रांती चौक शिवाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. याप्रसंगी प्रभागातील दानशूर रक्तदात्यांनी शिबिराच्या ठिकाणी येऊन आपले अमूल्य रक्तदान केले .

कोरोना या महाभयंकर आजारात रक्तसाठ्याचे संकलन खूप गरजेचे आहे. त्याच दृष्टीकोनातून ते आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंकुश कोळी, बाबू सपकाळे,विनायक पाटील ,संतोष भिंताडे,विठ्ठल पांगारे,सोनू पाटील,योगेश कदम, नवल सपकाळे, प्राविण पाटील,निशांत काटकर ,दीपक धुमाळ ,ऋषिकेश गायकवाड , सागर कुटुंबबळे, दीपक वारे, ललित वारे ,महेश मराठे, महेश सोनवणे ,विकी वरे ,अशोक चौधरी,रोशन परदेशी,प्रशांत पाटील ,वेदांत जाधव, कुणाल मराठे, जयेश सोनवणे, सुनील पवार, संतोष पवार, विनायक लेकुरवाळे ,गणेश माळी ,गणेश सोनवणे ,जयेश इंगोले आदी उपस्थित होते.

Exit mobile version