Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजीनगरात महापौर व उपमहापौरांच्या उपस्थितीत विकासकामांना प्रारंभ (व्हिडिओ)

जळगाव सचिन गोसावी । महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत आज शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला. या भागात पहिल्यांदा काँक्रीटीकरण करण्यात येत असून पावसाळ्यानंतर गटारी आणि अन्य कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती महापौर आणि उपमहापौरांनी केली.

याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, नगरसेविका कांचन सोनवणे, गायत्री शिंदे यांच्यासह महापालिका अभियंता चंद्रकांत सोनगिरी, महापालिका कर्मचारी प्रकाश सोनवणे, शांताराम सोनवणे तसेच समाजसेविका ज्योत्स्ना दारकुंडे, समाजसेवक नीलेश तायडे, मनोज सोनवणे, भगवान सोनवणे, गोपी गोसावी, मनोज आटवाल, विजय राठोड, उत्तम शिंदे, रवी पाटील, कौशल भोसले व प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. त्या अनुषंगाने या भागातील नागरिकांना रस्त्यांच्या अवस्थेने कमालीचे हैराण केले होते. त्याची गंभीरतेने दखल घेऊन प्रभागातील नगरसेवक, नगरसेविकांनी महापौर, उपमहापौरांकडे सातत्याने रस्त्यांच्या कामांसंदर्भात पाठपुरावा केला. त्यानंतर आज सकाळी या परिसरातील काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे पाहावयास मिळाले.

Exit mobile version