Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजीनगरात किरकोळ कारणावरून तरूणाला मारहाण

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून शिवाजीनगर हुडको येथील २३ वर्षीय तरूणाला दोन जणांनी दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी दोन जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, गजानन रमेश पाटील (२३) हा तरूण शिवाजीनगर हुडको येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. गुरुवारी घराजवळून गोला गाडी चालक हा घंटा वाजवित असताना गजाजन याने घंटा वाजवू नकोस घरात लहान मुले झोपली आहेत. त्यावरून किरकोळ वाद झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी गोलागाडी चालकासह त्यांचा भाऊ असे दोघांनी गजानन यास दगडाने मारहाण करून जखमी केले. यात त्याच्या पायात्वा दुखापत झाली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version