शिवाजीनगरातील रस्त्याचे काम पुर्ण करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर परिसरात झालेलया अमृत योजना व ड्रेनेजमुळे रस्ता खराब झालेल्या रस्त्याचे काम दिल्या आश्वासनानुसार अद्याप सुरू झालेला नाही. येत्या आठ दिवसांत कामाला सुरूवात न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आयुक्त सतिष कुळकर्णी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी नगरातील कंक यांच्या घरापासून ते क्रांतीचौक पर्यंतचा रस्ता अमृत आणि ड्रेनेजमुळे अत्यंत खराब झाला आहे. यामुळे स्थानिक रहिवाश्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम विजेचा खांब अत्यंत धिमीगतीत सुरू आहे.  त्यामुळे शिवाजी नगरातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी लेंडी नाला, अमर चौक, साठे चौक, क्रांती चौक परिसरातील नागरीकांना धुळीचा सामना करावा लागत आहे.  

यामुळे येथील नागरीकांना ८ मार्च रोजी शिवाजी नगरात रास्ता बंद आंदोलन करण्यात आले होते. यावर महापालिका प्रशासनाने पंधरा दिवसात कामाला सुरूवात करणार असे आश्वासन दिले होते. आज आंदोलनाला महिना पुर्ण होत असून अद्यापपर्यंत कामाला प्रत्यक्षात सुरूवात झालेली नाही. येत्या आठ दिवसात कामाला सुरूवात करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

या निवेदनावर नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नरेश महांगडे, श्रीराम जाधव, मुधकर मांढरे, सी.एस. गोपर्डीकर, स्वाती वरखडे, प्रविण भुरळकर, अंकुश कोळी, संजय मोजर, भगवान सोनवणे, गणेश लोहार, किरण कांगरे, विक्की शिंदी, अजय चोरट, आकाश पटेल, तानाजी वरखेड, दिपक पाटील, कमलेश राणा, हिरामण तरठे, माधव तेलंग यांच्यासह शिवाजी नगरातील रहिवाश्यांच्या स्वाक्षऱ्‍या आहेत.

Protected Content