Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं खिशात, सगळे डिटेल्स देतो’

अहमदनगर : वृत्तसंस्था । तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला, तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे मी देईल,” असा निर्वाणीचा इशारा अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला.आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असंही ते म्हणाले.

 

“आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो , असेही ते म्हणाले .

हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषण करण्याचे जाहीर करुन ते मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे?, असा खोचक सवाल केला. त्यांनंतर अण्णा हजारे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

यावेळी अण्णा हजारे यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली. शिवसेनेचा मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तो बाहेर काढण्याचाही निर्वाणीचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. भाजप सत्तेवर आल्यानंतर माझे एकूण ६ आंदोलनं झाली, हे आंदोलन आपण विसरलात का?,” असा प्रतिप्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.

अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आवाहन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात केले. “लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!,” असं शिवसेनेने सामनामध्ये म्हटलंय.

Exit mobile version