Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना हा विचार आहे , विचार मरत नाहीत — ना गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी । युवासेना , शिवसेना हा पक्ष नाही , संघटना नाही , हा एक  विचार आहे आणि विचार  मरत  नाहीत , पक्ष – संघटना संपतात , विचार नाही , असे प्रतिपादन आज पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी केले. 

 

युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तरुणाईला साजेसे उत्स्फूर्त मार्गदर्शन केले . ते पुढे म्हणाले की , आजच्या मेळाव्याकडे पाहून मलाही वाटतेय की … आज मी पण आज तरुण असतो तर … आम्ही तरुण होतो तेंव्हा आमचा काळ  वेगळा होता  विचारांनी वेडा  असलेला , भारावलेला कार्यकर्ता त्याकाळीही होता त्याच्यामागे कुणी आमदार , खासदार , मंत्री नाही अशा काळात शाखा स्थापन केली की पोलीस , बोर्ड लावला की पोलीस आंदोलन केले की पोलीस असायचे . अशा काळात आमच्यासारख्या असंख्य तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला १०० टक्के काँग्रेसची सत्ता होती प्रवाहाविरुद्ध पोहताना दम लागतो कधी कधी माणूस मरतोही . पण अशा काँग्रेसच्या प्रवाहाविरोधात आमच्यासारख्या असंख्य  तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला १९८४ साली आम्ही तुमच्यासारखाच कच्चा माल होतो मात्र मनात एक विचार एक नेता व एक झेंडा पक्का होता शिवसेनेचा शि म्हणजे शिस्तबद्ध , व म्हणजे वचनबद्ध , से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे नामर्दांना स्थान नाही , हे आमचे ब्रीद आम्हाला वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दिले आहे फॅक्टरीमध्ये कच्चा माल येत नाही तोपर्यंत पक्का माल तयार होत नाही आमच्याकडे पहा माणसाचे मन तरुण असायला पाहिजे मी फार मोठा वक्ता नव्हतो जेमतेम १२ वि पास होतो पण जे करता येईल ते केलं नोकरीचा कधी विचार केला नाही तुम्ही पण नुसत्या नोकरीच्या मागे लागू नका तरुणाने फक्त चोरीची लाज बाळगावी बाकी  कोणत्याच  कामाची लाज बाळगू नये तुम्ही पण नोकरीच्या विचारात राहू नका कोणतेही  काम करा साधा भाजीपाला विकणारा ४०० रुपये रोज कमावतो हा विचार करा कामे भरपूर आहेत दुसऱ्याला तुमच्याकडे नोकरी देण्याची धमक ठेवा माझ्याकड़े एकही मुस्लिम नोकरी मागायला येत नाही ते जे मिळेल  ते काम करतात  पक्षात पद वशिल्याने नको तर कामाच्या जोरावर मिळाले पाहिजे  निष्ठा महत्वाची . चढ उतार येत राहतात असे अनेक चढ उतार शिवसेनेनेही पाहिले आहेत कित्येकदा लोकांचे , पत्रकारांचे अंदाज असायचे की आता शिवसेना संपली पण तसे कधी झाले नाही शिवसेना पुन्हा उभी राहिली तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कार्डावर छापण्यापुरते पद घेऊ नका काम महत्वाचे कोरोनाकाळात मला उद्धवसाहेबांनी संयमाने काम करण्याचा सल्ला दिला होता मित्रांनो तुमच्याकडे फक्त एकच जबाबदारी आहे , सभासद नोंदणीची . लाज डोक्यातून काढा त्यादिवशी तुम्ही श्रीमंत व्हाल आम्ही बघा ना निवडणूक हरतो , पुन्हा लढवतो सतत काहीतरी करत राहतो शिवसेना , युवसेना , महिला आघाडी असे सर्वांचे कार्यक्रम चालू राहिले पाहिजेत त्यातून आपला प्रभाव वाढतो युवासैनिक असो की शिवसैनिक तुमच्या शरीरातील आंदोलन  मरायला  नको ज्या दिवशी तुमच्यातील आंदोलन मरेल त्यादिवशी तुम्ही राजकीय दृष्ट्या मृतवत होता उद्धव ठाकरे  साहेबांचा आदर्श घ्या त्यांच्या हृदयात १० स्टेन्स आहेत तरीही सतत कार्यमग्न राहणार हा माणूस प्रभावी तितकाच फ्रेश दिसतो , असेही ते म्हणाले .

Exit mobile version