Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना महिला आघाडीने किल्ल्यावर साजरी केली शिवजयंती

 

यावल, प्रतिनिधी । येथील शिवसेना महीला तालुका आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. दरम्यान यावल शहरालगत असलेल्या प्राचीन ऐतिहासिक किल्यावर शिवसेना महीला आघाडीतर्फे अभिवादन करण्यात आले.  

शिवसेना महीला आघाडीच्या सपना घाडगे, सुनंदा निळकंठ पाटील, संगीता कोळी, दुर्गा कांतीलाल पाटील, अलका कोळी, भारती वसंता जंजाळकर, सविता संदीप कोळी, द्वारका भास्कर सुतार, अंजनाबाई कोळी , शकुंतला कोळी, आशा सुर्यवंशी यांच्या परिसरातल्या असंख्य महीलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येत आहे. तत्पुर्वी यावल शहरातील तरूणांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन एक दिवस महाराजांसाठी अशा स्तुस्त्य उपक्रम राबविण्यात आला.  या दोनशे वर्षाहुन अधिकचा इतिहास असलेल्या किल्याच्या परिसराची शिवजयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छतेच्या उपक्रमात शहरातील डॉक्टर , वकील , शिक्षक , मोलमजुरी करणारे सर्वसामान्य नागरिक व समाजसेवकांनी आपला सहभाग नोंदवला.

 

Exit mobile version