Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र (व्हिडिओ)

 

 

जळगाव, राहुल शिरसाळे । शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र उघडण्यात आले असून याचे उद्घाटन करण्यात आले.

 शिवसेना महानगरतर्फे संत कंवरराम चौक (पांडे डेअरी चौक) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र सुरु राहणार आहे. या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी करून देण्यात येणार आहे. या केंद्राचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधीपक्ष नेते सूनील महाजन, विराज कावडीया यांच्या हस्ते होत आहे. या वेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, शिवसेना नगरसेवक नितीन बर्डे, शहर संघटक दिनेश जगताप, विभागप्रमुख प्रशांत सुरळकर, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अर्जुन भारुळे, पियुष हसवाल, हितेश सूर्यवंशी, राहुल चव्हाण, प्रशांत वाणी, संदीप सूर्यवंशी, वैभव पाटील, शिवम महाजन, गोपाळ पाटील, सुनील मराठे, गजेंद्र चौधरी, चंद्रकांत मराठे उपस्थित होते.  याप्रसंगी उद्घाटक जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण यांनी जेष्ठ नागरिकांनी या ऑनलाईन कोविड लस नोंदणी सुविधेचा लाभ घ्यावा व सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर करावे असे आवाहन केले. 

 

 

Exit mobile version