Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना महानगरतर्फे जेष्ठांसाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना जळगाव महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र पांडे डेअरी चौक येथे उघडण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन उद्या रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

शिवसेना जळगाव महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र रविवार दि. ७ ते सोमवार १५ मार्च दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संत कंवरराम चौक (पांडे डेअरी चौक) जळगाव येथे सुरु राहणार आहे. या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची कोविड लससाठी ऑनलाईन नोंदणी करून देण्यात येणार आहे. केंद्राचे उदघाटन उद्या रविवारी सकाळी ११ वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, विराज कावडीया यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version