Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना जळगाव महानगरतर्फे निलंबित १२ आमदारांचा निषेध (व्हिडिओ)

जळगाव सचिन गोसावी । इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज शिवसेनेतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यात जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. याप्रसंगी विधानसभेत गोंधळ घालणार्‍या भाजपच्या १२ आमदारांचा निषेध करण्यात आला. 

महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या भाजपच्या १२  आमदारांचा शिवसेना जळगाव महानगरतर्फे प्रतिमेवर शाइफेक करून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली.  आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने आंदोलन केले. याप्रसंगी नगरसेवक नितीन बरडे, बंटी जोशी, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जॅकीर पठाण, चिंतामण जैतकर, उपमहानगरप्रमुख मानसिंग सोनवणे, कोमेश सपकाळे, ललित धांडे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, ज्योती शिवदे, मनीषा पाटील, विमल वाणी, निलू इंगळे, मीना सांगोळे, विभाग प्रमुख विजय बांदल, विश्वास महांगडे, शंतनू नारखेडे, दर्शन चौधरी, संजय सांगळे, किरण ठाकूर, वसीम खान, विराज कावडिया, अमोल सोनवणे, जय मेहता, अमित जगताप, प्रीतम शिंदे, प्रशांत फाळके, युवा सेना महानगर प्रमुख विशाल वाणी, स्वप्नील परदेशी, शैलेश काळे, राजेश वारके, सचिन पाटील, जब्बार शेख, राहुल ठाकरे, दीपक कुक्रेजा, अशपाक बागवान, इकबाल शेख , शोएब खाटीक, संजय सांगोळे, वसंत कोळी, अक्षय सोनवणे, मुन्ना पवार, योगेश सोनवणे, विजय ठाकूर, पंकज सपकाळे, मनीष कुक्रेजा, विजय लुल्ला, दीपक तलरेजा, मोहित भादवानी, विजय कोळी, विकास चौधरी, रवी कोळी आदी उपस्थित होते.

 

 

Exit mobile version