Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना जनसामान्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने मार्गी लावणारा पक्ष

 

भुसावळ,प्रतिनिधी । शिवसेना या पक्षाचा जन्म आंदोलनातून झालेला असून सामान्य माणसाचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडविण्यात सतत प्रयत्नशील आणि अग्रेसर असतो. तालुक्यातील वेल्हाळे गाव व परिसरातील बेरोजगारी, राखेचे प्रदूषण, वाहतूक, साठवणूक, वनजमिनीच्या दाव्यांचा प्रश्न व इतर प्रलंबित प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी अतिथी म्हणून उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हाप्रमुख अॅड. शाम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, शेतकरी सेनेचे सुभाष पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे सईद शेख भिकारी, जिल्हा युवा सेना अधिकारी चंद्रकांत शर्मा, शाखाप्रमुख प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या शेतकरी हिताच्या विरोधात जे नुकतेच विधेयक पारित झालेले आहे त्या शेतकरी विरोधी विधेयकाचा ध्येयधोरणांचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी भुसावळ तालुक्यातील शिवसेना आणि अंगीकृत संघटनांची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक आणि आभार संतोष सोनवणे यांनी मानले.

यांना केला शिवसेनेत प्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यशैली आणि जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य सुभान चंदू गवळी, वैभव हेमंत पाटील श्री महाजन, रुपेश पाटील, तुषार बावस्कर, सागर चौधरी, अमोल ठोके, प्रशांत ठोके, मिलिंद पाटील, संजय लुले, ज्ञानेश्वर कोलते, राजू राणे यांच्यासह यांच्यासह अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या बैठकीला शिवसेना युवासेना, शिक्षक सेना, दिव्यांग सेना, शेतकरी सेना, महिला संघटना, ग्राहक संरक्षण कक्ष यांचे पदाधिकारी गटप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख, उपगण प्रमुख, उपशहर प्रमुख यांच्यासह पवन नाले, दीपक धांडे, हेमंत खंबायत, शरद जोरे, सोनी ठाकूर अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाप्रमुख अब्रार खान, युवा सेनेचे हेमंत बराटे, सुरज पाटील, निलेश ठाकूर, नरेंद्र लोखंडे, सुनील भोईर, तुषार चौधरी, सुपडू धनगर, गोविंदा माळी, देवेंद्र पाटील शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version