Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवशंभू संघटनेच्या युवती जिल्हाध्यक्षपदी कविता पाटील

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील रहीवासी कविता ज्ञानेश्वर पाटील यांची शिवशंभू संघटनेच्या युवती जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

कविता पाटील ह्या मागील एक ते दीड वर्षांपासून शिवशंभू संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहते. यात त्यांनी वृक्षरोपण,भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करणे , अतिदुर्गम क्षेत्रात पाडया वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान,सैनिकांच्या कुटूंबिचा सत्कार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे आदी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच्या कार्याची संघटनेने दखल घेत संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा ज्योती पाटील यांनी पत्राद्वारे त्यांची जळगांव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे कळवले आहे. त्यांच्या निवडीने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निवडीनंतर कविता पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, आपण गोरगरिबांच्या अडचणी, महिला अत्याचार व त्यांच्या समस्या आणि अडी अडचणीवर मात करून त्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तप्तर राहू.

Exit mobile version