Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवरायांच्या पोस्टरची विटंबना : नगरसेवकावर कारवाईची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करून याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरूणास मारहाण करणारे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी नगरमध्ये भाजपचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांच्या सीताराम पैलवान यांच्या मळ्यातील बांधकाम चालू असल्याने यांनी शिवाजी महाराजांच्या पोस्टरचा वापर मुतारीसाठी केल्याने सागर पाटील या तरुणाने नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना जाब विचारला. यावर नगरसेवक चौधरी काहीही स्पष्टीकरण न देता त्यांनी आपल्या मुलं व भावांच्या मदतीने सागर पाटील याच्यासह त्याच्या घरातील शेखर पाटील, अविनाश पाटील व मीनाबाई पाटील यांना मारहाण तर केलीच. पण पोलिसांना चुकीची माहिती देऊन सागर पाटील यांच्या परिवाराला पोलीस स्टेशनला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले.

शिव प्रतिमेची विटंबना करून वरून संबंधीत तरूणावर हल्ला करण्याचे वृत्त आज सकाळपासून सोशल मीडियात व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चाळीसगावात छिंदम प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप करत सोशल मीडियात यावरून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने भाजपने नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version