Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवपूर कन्हाळा परीसरात दोन दारूभट्ट्यांवर पोलीसांची धाड; दोन जणांवर गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील शिवपूर कन्हाळा शिवारातील दोन दारूभट्टी भुसावळ पोलीसांनी कारवाई करत एकुण ९३ हजार रूपयांची दारू नष्ट करण्यात आली असून दोघांविरोधात भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शिवपूर कान्हाळा गावातील गवळी वाड्यात सार्वजनिक झुडपात संशयित आरोपी खलील हसन गवळी रा. कन्हाळा हा बेकायदेशीर दारू तयार करून ९ ड्रम व २५ लिटर दारू ६० हजार ७५० रूपयांची दारू नष्ट केली. तर त्याच शिवारातील नाल्याजवळ आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गुळ व महू मिश्रीत कच्चे व पक्के रसायन असे पाच ड्रम आणि ३० लिटर दारू नष्ट करण्यात आली असे एकुण ९३ हजार रूपये किंमतीची दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरी रामकृष्ण कुंभार, पोहेकॉ अजय माळी, पोहेकॉ प्रवीण पाटील, पोहेकॉ विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनूस ईब्राहिम, होमगार्ड भूषण पाटील यांनी केली आगे.

Exit mobile version