Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवपूर कन्हाळा परिसरात हातभट्टीची दारू जप्त

भुसावळ, प्रतिनिधी । तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा परिसरातील हातभट्टीचे कच्चे रसायन व हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.

शिवपूर कन्हाळा परिसरातील सुभान तुकडू गवळी हा जळत्या भट्टीवर दारू तयार करत असतांना व ताब्यात महू नवसागर गूळ मिश्रीत कच्चे रसायनचे १० ड्रम १९०० लिटर आणि हात भट्टीची ५० लिटर तयार दारू अंदाजे किंमत ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवपूर कन्हाळा येथे इरफान हसन गवळी हा जळत्या चालू भट्टीवर दारू तयार करत असतांना व त्याच्या ताब्यात महू नवसागर मिश्रीत कच्चे व गरम रसायन सह ६ ड्रम ११०० लिटर हात भट्टीची ४० लिटर तयार दारू अशी अंदाजे किंमत २८ हजार ६०० रु किंमतीचा माल मिळून आला. शिवपूर कन्हाळा या गावी शेताच्या बाजूला रशीद रन्नु गवळी हा जळत्या भट्टीवर दारू तयार करत असतांना व त्याच्या ताब्यात महू नवसागर मिश्रीत गरम व कच्चे रसायन ६ ड्रम ११०० लिटर तयार दारू ६५ लिटर अंदाजे ३० हजार ६०० रु किंमतीचा माल मिळून आला. त्यांच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि संचारबंदी आदेशाचे अवमान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. याछाप्यात २२ ड्रममधील एकुण १ लाख, ६ हजार ७०० रुपयांची गावठी हात भट्टीचे कच्चे रसायन व दारु गाळण्याची सामग्री नाश करण्यात आ़ले आहे. कारवाई उप विभागीय पो अधिकारी गजानन राठोड यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरी रामकृष्ण कुंभार, पो. हे. कॉ. युनुस इब्राहिम शेख, विठ्ठल फुसे, प्रवीण पाटील, विजय पोहेकर, रियाज काझी, अजय माळी, प्रेमचंद सपकाळे यांनी केली आहे.

Exit mobile version