Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसोली वनक्षेत्रातून लोखंडी अँगल लांबविणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली गावाजवळील वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१५ मधील राखीव वनातून ८ हजार रूपये किंमतीचे लोखंडी अँगल चोरून नेणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी जळगाव शहरातून अटक केली आहे. गुरूवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१५ मधील राखीव वनातून आठ हजार रूपयांचे कंपाउंडचे लोखंडी अँगल चोरट्यांनी लांबविल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलिस चोरट्यांच्या शोधार्थ होते. अखेर पोलिस कर्मचारी प्रदीप पाटील, स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनीपांडूरंग फकीरा पाटील (रा.वाटीका आश्रम, जळगाव), पंकज शरद पवार (रा. द्वारका नगर, जळगाव) आणि मुकेश भास्कर गायकवाड (रा. दादावाडी,जळगाव) यांनी लोखंडी अँगल लांबविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी ७ डिसेंबर रोजी तिनही आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. गुरूवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

Exit mobile version