Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसोली रस्त्यावर अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारची चारचाकीला धडक

जळगाव प्रतिनिधी । अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी कारची पुढे चालणाऱ्‍या चारचाकी वाहनाला जोरदार धडक बसली. हा अपघात शनिवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावर घडला, या घटनेत जैन कंपनीच्या कार चालकाला तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

भालचंद्र उत्तम पाटील (रा. एकलग्न) हे बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत वाहनावर चालक म्हणून कामाला आहेत. शनिवारी सकाळी ते शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स येथील कँन्टीनमध्ये डबे घेण्यासाठी कार क्रमांक (एमएच १९ बीजे ८९७५) ने आले होते. सुमारे साडे अकरा वाजेच्या सुमारास ते वाहनात डबे भरून जैन इरिगेशन कंपनीच्या दिशेने निघाले. गुंजन मंगल कार्यालयाजवळून जात असताना पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांनी त्यांच्या वाहनाचा ब्रेक मारला. त्यामुळे मागून भरधाव येत असलेली (एमएच १९ बीजे ७८९४) ने जैन कंपनीच्या वाहनाला जोरदार धडक दिली.  

दरम्यान, अपघात झाल्यानंतर कारमधील तीन जण खाली उतरले व त्यांनी भालचंद्र पाटील यांना मारहाण केली. बेदम मारहाण केल्याने त्यांचे कपडे फाडले त्यात चांलक पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकांना बोलवून एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. नंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. सायंकाळी उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Exit mobile version