Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसोली येथे एकाने घेतला गळफास

शिरसोली प्रतिनिधी । अशोकनगरातील ५२ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्या उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

कैलास विठ्ठल सोनवणे असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती असी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. अशोकनगर मधील रहिवासी कैलास विठ्ठल सोनवणे (वय ५२) हे व पत्नी ज्योती, मुलगा योगेश काल रात्री १० वाजेच्या सुमारास झोपलेले होते. पुढच्या घरात कैलास हा एकटाच झोपलेला होता. पत्नी व मुलगा मागच्या घरात झोपले असल्याने कैलास याने छताच्या कडीला ओढणी बाधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब रात्री १०:३० वाजता पत्नी उठली तेव्हा ही घटना समोर आली. यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे गल्लीतील नागरीकांनी गर्दी केली. यावेळी शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना बोलविले यांनी जळगाव शासकीय महाविद्यालयात व रुग्णालयात कैलासला आनले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. कैलास हा दारुच्या व्यसनाधीन होता. यामुळे त्याला नैराश्य आल्यामुळे ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.  जळगाव एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राठोड, राजु ठाकरे करीत आहे.

Exit mobile version