Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसोली येथील तरूण शेतकऱ्याचा विषबाधा झाल्याने मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील नेव्हरे शिवारात शेतात कपाशीवर फवारणी करीत असताना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तरुण शेतकऱ्यास विषबाधा झाली. अत्यवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होत. दरम्यान आज सकाळी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक उर्फ बुधा एकनाथ पाटील (वय-३६) रा. शिरसोली असे मयत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. अशोक हे सोमवारी २१ सप्टेंबर रोजी शिरसोली शिवारातील नेव्हरे शिवारातील शेतात कपाशीवर औषध फवारणी करीत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास विषारी औषधांची बाधा झाल्यामुळे प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नातेवाईकांनी लागलीच उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी ७.३० वाजता उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version