शिरसोली गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना गावातील अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.

Protected Content