Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिरसाळा येथे हनुमान मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन

बोदवड , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाळा येथील हनुमान देवस्थान येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

 

शिरसाळा येथील हनुमान देवस्थान हे गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही शासनाच्या निधी अभावी स्वयंभू प्रकारे विकसित होत होते. परंतु, येथे बऱ्याच असुविधा भाविकांना येत असल्याने या देवस्थानाचा जिल्हा वार्षिक योजनेतील तिर्थक्षेत्र पर्यटनमध्ये समावेश करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून श्रीक्षेत्र शिरसाळा हनुमान मंदिराचा क दर्जाचे तिर्थक्षेत्रामध्ये समावेश केला. याअंतर्गत आज शनिवार दि.१६ एप्रिल रोजी असलेल्या हनुमान जयंतीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र शिरसाळा हनुमान मंदिर येथे जिल्हा वार्षिक तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम तसेच मंदिराचे सुशोभिकरण करणे व हायमस्ट लॅम्प बसविणे या विविध ४० लाख रुपयांच्या विकास कामांचे कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी काँग्रेसचे डॉ. जगदीश पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, काँग्रेस युवकचे हितेश पाटील , शिवसेना तालुका प्रमूख छोटू भोई, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, बोडवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, बोदवड व मुक्ताईनगरचे समस्त शिवसेना नगरसेवक,शहरप्रमुख गणेश टोंगे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, बोदवड शहरप्रमुख राहुल शर्मा, बोदवड तालुकाप्रमुख शहरप्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी बोदवड दिपक माळी, सचिन पाटील, सरपंच प्रविण पाटील, योगेश पाटील व हनुमान मंदिर संस्थान अध्यक्ष पाटील व विशवस्त तसेव्ह हनुमान भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version