Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षिका डॉ. भाग्यश्री वानखेडे यांना पुरस्कार प्रदान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका डॉ.भाग्यश्री वानखेडे यांना रेडियंट्स संशोधक आणि अभ्यासकांसाठी आंतरराष्ट्रीय फाउंडेशन मार्फत उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे.

डॉ. वानखेडे यांनी भूजल संशोधन, भूपृष्ठभागाचे मूल्यांकन, लिथोलोजी भूगर्भीय संरचना, खडकांची जलवैज्ञानिक वैशिष्ट्ये, पाणी वापर नमुना, पर्जन्यमान नमुना, गोमाई व अमरावती पाणलोक क्षेत्रात तापी नदीच्या उत्तर व दक्षिण बाजू, नंदुरबार जिल्हा, मध्य प्रदेशातील खरगोन या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे. या संशोधनाचा महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील २५४ गावांना उपयोग होणार आहे. केलेल्या संशोधनामुळे डॉ. भाग्यश्री वानखेडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कबचौउम विद्यापीठाचे मार्गदर्शक प्रा.व्ही. एम.रोकडे, प्रा. एस.एन.पाटील, कुलसचिव एस.टी.इंगळे, धनदाई एज्युकेशन सोसायटीचे संचालक डी.डी.पाटील,मुख्याध्यापक के. डी. पाटील व पती डॉ. जगदीश सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. वानखेडे यांचे संशोधन सर्वांना उपयोगी ठरणार आहे.

Exit mobile version