Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षणातूनच यशाचा खरा मार्ग – सुभाष जाधव

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देशापासून ते समाजापर्यंत समाजसेवेचे व्रत हे शिक्षणात असून शिक्षणातूनच यशाचा खरा मार्ग शोधता येतो असे प्रतिपादन वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी केले.

यावेळी इयत्ता पहिली ते दहावीच्या एकूण 730 विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एच.निकुंभे तर आभार प्रा. नितीन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदल जाधव तर प्रमुख उपस्थिती वसंतराव ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव, संतोष जाधव, अभेराम जाधव, एकनाथ जाधव, गजमल जाधव, आत्माराम जाधव, मधुकर जाधव, जगन जाधव, पोलीस पाटील विलास जाधव, केळकर जाधव, अशोक जाधव, किशोर जाधव प्राथमिक मुख्याध्यापक सोपान पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी. के. पोतदार, जेष्ठ शिक्षक एस.जे.भामरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version