Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षक पत्नीच्या फिर्यादीवरून शिक्षक पतीवर गुन्हा

 

 

रावेर : प्रतिनिधी । २५ वर्षांपूर्वी विवाह  झालेला  असताना  सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याच्या शिक्षक पत्नीच्या फिर्यादीवरून शिक्षक पती आणि तिच्या सासरच्या कुटुंबाविरोधात रावेर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

फिर्यादी सौ जयश्री संजय कुलकर्णी ह्या कलमलाबाई मुलींची शाळा येथे शिक्षिका असून  २५  वर्षांपूर्वी संजय नारायण कुलकर्णी  शिक्षक (रा म्हसावद) यांचेशी लग्न झाले पती  अडावद येथे शिक्षक म्हणून नोकरीस  आहे या दाम्पत्याला  एक मुलगा व एक मुलगी आहे  सुरवातीला चांगला संसार चालला परंतु पतीने टोचून बोलणे ,  स्वयंपाक नीट केला नाही असे किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास देत राहिले    त्रास वाढतच जाऊन पैशाची मागणी नियमित करू लागले व क्रूर वागणूक देऊ लागले होते

 

सौ जयश्री कुलकर्णी यांनी महिला दक्षता समिती (जळगाव) येथे तक्रार दाखल केली होती  दोन्ही पक्षांना बोलावून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला परंतु वाद मिटला नाही शेवटी फिर्यादी यांचे फिर्यादवरून शिक्षक पती संजय कुलकर्णी, सासरे नारायन कुलकर्णी, सासू शैलेजा कुलकर्णी , दीर विवेक  कुलकर्णी, दीर उपेंद्र कुलकर्णी, नणंद वैशाली भावे यांचे विरोधात   भा द वि  कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक  इस्माईल शेख करीत आहेत.

Exit mobile version