शिक्षक दिनानिमित्त डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे ऑनलाइन व्याखान

जळगाव, प्रतिनिधी ।  दर्जेदार वाचन शिक्षक व विद्यार्थी दोघांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीला समृद्ध करते  असे प्रतिपादन साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले. शिक्षक कार्य गौरव सप्ताह निमित्ताने शिक्षण महर्षी डॉ. जे. पी. नाईक व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्याने शिक्षकदिनी  भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित ऑन लाईन व्याख्यानात ” शिक्षकांनी काय वाचावं ? विद्यार्थ्यांपर्यंत ते कस पोहोचवावं ” या विषयानुषंगे  मार्गदर्शन करतांना साहित्यिक चंद्रकांत भंडारी बोलत होते.

वेळेच भानं व कोरोना निर्बंधाची जाणं ठेवून अध्यक्ष व प्रमुख अतिथीविना हा अनोखा प्रयोग ! मार्गदर्शनात भंडारी पुढे म्हणाले की, दर्जेदार ग्रंथवाचना एवढेच  वृत्तपत्रांच्या पुरवण्या वाचनाने  ताजे व वैविध्यपूर्ण विषयांमुळे सामाजिक मूल्यांचे भान व कर्तव्याची जाण येऊन वाड़मयीन अभिरुची वाढते. ज्ञानरचनावादी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील सृजनशील शिक्षक व प्रयोगशील शाळांची त्यांनी सोदाहरण माहिती दिली. विषयांतील सखोल ज्ञान व अध्यापन शास्त्रातील कौशल्य विकसित होण्यासाठी शिक्षक अपडेट व ॲडव्हान्स वाचन करीत नाहीत याची खंतही त्यांनी व्यक्त केली.  प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जिल्हाप्रमुख  विजय लुल्हे यांनी भंडारी सरांचा साहित्यिक प्रवास व के.सी. ई. सोसायटी समन्वयक म्हणून केलेले  विद्यार्थी व पालक यांच्या संदर्भातील विशेष प्रबोधनपर उपक्रम परिचयात सांगितले. भिशीतर्फे शिक्षक दिनाच्या औचित्याने लुल्हे यांनी शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन चंदकांत भंडारी यांचा भावपूर्ण सत्कार केला.आभार तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी केले. व्याख्यानास अंनिस ज्येष्ठ कार्यकर्ते डिगंबर कट्यारे व शिरीष चौधरी, सुप्रसिद्ध लेखक राजेंद्र पारे , डायेटचे किशोर पाटील , हर्षवर्धन भंडारी ,सौ. सुनिता भंडारी,  डॉ.विजय बागूल, उषा सोनार , गजश्री पाटील, सुजाता निकम , वंदना वानखेडे , अरुण पाटील, श्रीकांत मोटे, अथर्व गुरव, बाळू पाटील यांचेसह ग्रंथप्रेमी शिक्षक व रसिकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

Protected Content