Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षकाच्या बदलीने गहिवरले विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |

गुरू आणि शिष्याचे नाते किती अतूट असते याची अनेक उदाहरणे आपल्या शिक्षण संस्कृतीत सामावलेली आहेत. असाच एक प्रत्यय निपाणे ता. पाचोरा येथील उपशिक्षक दिपक हिरे यांची प्रशासकीय बदली झाल्याने आला.

 

नुकत्याच ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा निपाणे ता. पाचोरा येथून उपशिक्षक दिपक रमेश हिरे यांची प्रशासकीय बदली संगमेश्वर ता. पाचोरा येथे झाली आहे. गेल्या ८ वर्षांपासून दिपक हिरे यांनी निपाणे शाळा येथे सेवा दिली. शाळेला आय. एस. ओ. मानांकन मिळवून देण्यात तसेच विविध स्तरावर शाळेला यश मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

 

या शाळेत परिसरातील विविध गावातून येऊन मुले शिकतात ही फार मोठ्या अभिमानाची बाब आहे. जर का प्रशासकीय बदली नसती तर दिपक हिरे यांना कधीच जाऊ दिले नसते असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मा. सदस्य रावसाहेब पाटील यांनी याप्रसंगी केले.

 

त्यांनी याप्रसंगी सांगितले की, दिपक हिरे यांनी आमच्या सर्व गावाला सोबत घेऊन दिवस – रात्र मेहनत करून शाळा नावारूपाला आणली. असे शिक्षक लाभणे भाग्याची गोष्ट असून सर्वच टीम चांगल्या प्रकारे काम करत आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मा. सदस्य रावसाहेब पाटील तसेच सरपंच रोशन पाटील, उपसरपंच शालिक पाटील तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, स्वराज्य गणेश मित्र मंडळ यांनी दिपक हिरे यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत व दिपक हिरे यांनी परत एकदा आमच्या शाळेत यावे असे सांगितले. ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा इतका सुंदर भावनिक नाते असल्याचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. या आधी दिपक हिरे यांनी विष्णुनगर, बोरखेडा याठिकाणी आपली सेवा दिली असून नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना घडविण्यात दिपक हिरे यांचा हातखंडा आहे.

Exit mobile version