Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षकांनी वाढवला गरिबा घरी दिवाळीचा गोडवा

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील ग्रामीण भागातील १३० गरीब आणि कष्टकरी कुटुंबांना शिक्षकांतर्फे दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

 

 

मुलांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये दातृत्वाचा संदेश देणारी परंपरा स्व कृतीतून दाखवावी, वर्षातल्या काही विशिष्ट सणांच्या निमित्ताने शिक्षकांनी एकत्र येऊन दिवाळी फराळासाठी निधी जमा केला. सणासुदीच्या काळात आपल्या हातून दान दिले जावे हीच यामागची प्रांजळ भावना होती. आपण कुटुंबासमवेत उत्सव साजरे करत असताना समाजातील उपेक्षित वंचित लोकांच्या घरातही सण साजरा व्हावा व त्यात आपला खारीचा वाटा असावा ही भावना प्रामुख्याने त्यात होती. समाजात अर्धपोटी झोपणाऱ्या लोकांची संख्या आजही कमी नाही कोणी अपंग कोणी मानसिक दृष्ट्या कमकुवत कोणी गरीब तर कोणी निराधार आहे.

 

अशावेळी आपल्यापैकी प्रत्येकाने हे सामाजिक दायित्व जबाबदारी आहे की, सभोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीत लोकांची जाण ठेवून आपल्या परीने शक्य तेवढी मदत निश्चितच केली पाहिजे व आपल्या अण्णा वैयक्तिक पातळीवर आपल्या परिसरातील गरजूंना यथाशक्ती मदत करून त्यांचा दिवाळीचा गोडवा वाढवला पाहिजे. ही जबाबदारी ओळखून आशाकिरण मंच व धनु दीप बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने ही मदत करण्यात आली. यासाठी १३० गरीब व गरजू कुटुंबांना फराळाचे वाटप करण्यात आले. यासाठी धनदिप संस्थेच्या अध्यक्ष यमुताई अवकाळे व मंच सदस्य डी ए धनगर, छाया ईसे, अशोक ईसे, भारती पाटील, स्वाती पाटील,सरीता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. दिवाळीच्या फराळाचे वितरणासाठी डी ए धनगर सर, दत्तात्रय सोनवणे, मनोहर नेरकर प्रकाश पाटील प्रवीण पाटील अशोक ईसे, छाया ईसे,सरीता जाधव, सुनेत्रा भांडारकर, नूतन पाटील, धनंजय पाटील व यांनी मदत केली.

Exit mobile version