Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षकांनी केली घरीच महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी

पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळेतील राज्य आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व महात्मा ज्योतीराव फुले गुरु गौरव आदर्श पुरस्कार विजेते वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे दरवर्षी महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाळेत समता पंढरवाड्याचे आयोजन करून माहिती देत असतात. मात्र, लॉक डाऊनमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येकक्ष न भेटता ते व्हाट्सअपद्वारे मार्गदर्शन करत आहे.

आज महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे त्यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला . मुख्याध्यापक साळुंखे यांनी संदेश म्हणुन एक दिवा ज्ञानाचा लेखन करुन फलक लावला. त्यांची मुलगी सुप्रभा साळुंखे हिने ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, एक दिवा समतेचा, एक दिवा कोरोनाचा अंधार घालविण्याचा हे संदेश देणारी रांगोळी काढुन दिपक लावले. मुख्याध्यापक साळुंखे यांचे घर बाजाराला लागुन असल्याने महत्वाच्या कामांसाठी तिकडुन वापरणाऱ्यांनी अप्रूप वाटुन थांबुन महात्मा ज्योतीराव फुले यांना अभिवादन केले. मुख्याध्यापक साळुंखे म्हणाले सर्व राष्ट्रपुरुष, राष्ट्रमाता, संत, महात्मे यांचे कार्य हे सर्व जगाच्याच कल्याणासाठी होते म्हणुन त्यांचे स्मरण व आदर्श हा धर्म, जातपात, पंथ, प्रांत, भाषा विरहित मानुन सदैव आदर्श ठेवावा त्याचीच आज संपुर्ण जगाला गरज आहे.

Exit mobile version