Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी – २०२० मध्ये पार पडलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

यात इयत्ता ५ वी वर्गातील अमृता कोरे, लक्षिता चौधरी, हर्षाली नागणे, निशांत पाटील, रियाज पटेल, भावेश पाटील, सर्वेश कोठावदे, लोकेश महाजन, अंशुल पाटील, हेमंत पाटील, जिज्ञासा मुणोत, साहिल पाटील, धनश्री पाटील, ओंकार रोकडे, अस्मिता सिनकर, प्रसाद हडपे, विशाखा सोनवणे, साक्षी माळी, समर्थ पाटील, अक्षदा वाघ, सत्यम सोमवंशी, गीतांजली पाटील, यश महाजन, जयंत चौधरी, खुशी भोई, कृतिका चंदिले, यज्ञश्री चौधरी तर इयत्ता ८ वी तील भार्गव जाधव, दिपाशा महाजन, संकेत पाटील, सत्यजित नलवाडे, भुवनेश पाटील, जयदीप चौधरी, रोहित पाटील, ऋतुजा पाटील, भाविक सूर्यवंशी, भावेशसिंग परदेशी, आदेश पाटील, दिव्या पाटील या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक सुशिल महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंडित शिंदे, उपाध्यक्ष निरज मुनोत, सचिव जे. डी. काटकर, सहसचिव शिवाजी शिंदे, युवानेते अमोल शिंदे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. गीते, पर्यवेक्षक जे. आय. पिंजारी सह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version