Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदाड येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

पाचोरा, -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिंदाड येथे जय महाराष्ट्र क्रिकेट क्लबतर्फे आयोजित खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ दि. ५ रोजी करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, सरपंच, ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम बक्षीस भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व मधुकर काटे, द्वितीय बक्षीस सुमित किशोर पाटील यांच्या कडून तृतीय बक्षीस विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर (पाटील), चतुर्थ बक्षीस धनराज पाटील पाटील बँड संचालक यांच्याकडून देण्यात येणार आहे. यात परिसरातील ४० संघांनी सहभाग घेतला आहे. समाज विकास विद्यालय समोरील पटांगणात शुभारंभाचा सामना क्रांती क्रिकेट क्लब शिंदाड व महसूल कर्मचारी पाचोरा यांच्यामध्ये खेळविण्यात आला. यात महसूल कर्मचारी संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. यात तहसिलदार कैलास चावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पंच म्हणून संदिप सराफ, विनोद तडवी यांनी काम पाहिले. उद्घाटनास ग्रामपंचायत सदस्य संदिप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, समाधान पाटील, माजी क्रिकेट खेळाडू धनराज पाटील, किशोर पाटील, बालू श्रावने, विजय पाटील, सोनू तुपे, प्रदीप बोरसे, रईस मन्यार, आत्माराम बोरसे, संदीप पाटील, आजी – माजी खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेला शकील तडवी, सोनू चौधरी, संदीप पाटील, किरण भोई व जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब चे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Exit mobile version